हिंगोली : शेतकऱ्याने कापसाच्या शेतात लावली गांजाची झाडे; पोलिसांची कारवाई | पुढारी

हिंगोली : शेतकऱ्याने कापसाच्या शेतात लावली गांजाची झाडे; पोलिसांची कारवाई

हयातनगर; पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील हयातनगर येथील मौजे लिंगी शिवारातील कापसाच्या शेतात लावलेली गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी केशव शामराव डांगरे (वय ३०) रा. पळशी, ता. वसमत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे लिंगी शिवारातील कापसातील शेतात गांजाची झाडे असल्याची गोपनीय माहिती हट्टा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि २९) धाड टाकून ४६ हजार २०० रूपये किंमतीच्या गांजासह ७ झाडे जप्त केली. ही कारवाई सपोनि गजानन बोराटे यांच्या पथकाने केली. यावेळी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी विनायक किन्होळकर, लिंगीचे तलाठी गजानन नागोरे, पळशी येथील तलाठी सचिन जोंधळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button