बीड : मस्साजोग येथून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण | पुढारी

बीड : मस्साजोग येथून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

केज; पुढारी वृत्‍तसेवा: केज तालुक्यातील मस्साजोग येथून दोन अल्पवयीन मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सुमित विकास रोडे (रा. मस्साजोग) आणि त्याचा मित्र गोविंद आश्रुबा पाळवदे (रा. सासुरा), अशी अपहरण झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलाचे वडील विकास लिंबाजी रोडे यांनी तक्रार नोंदवली आहे. या अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुरूवारी (दि.२७) केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अज्ञात व्यक्तिंविरूद्ध गु. र. न. ४९२/२०२२ भा. दं. वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button