बीड: बसवर दगड मारून मद्यधुंद व्यक्तीची चालकाला जीवे मारण्याची धमकी | पुढारी

बीड: बसवर दगड मारून मद्यधुंद व्यक्तीची चालकाला जीवे मारण्याची धमकी

केज: पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यातील पिंपळगाव पाटीजवळ एका मद्यधुंद व्यक्तीने चालत्या एसटी बसवर दगड मारून काच फोडली. तसेच चालक, वाहकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आज (दि.२३) दुपारी २ .३० च्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, आज दुपारी २. ३० च्या सुमारास धारूर आगाराची बीड-केज ही बस (एमएच-२०/डी-९९२३) विड्याहून केजकडे येत होती. यावेळी पिंपळगाव फाट्याजवळ एका मद्यधुंद व्यक्तीने बसच्या डाव्या बाजूच्या समोरील काचेवर दगड मारून काच फोडली. तसेच चालक व वाहक यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चालक अशोक हुंबे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button