धक्कादायक! व्हॉट्सॲप 'या' फोनमध्ये होणार बंद | पुढारी

धक्कादायक! व्हॉट्सॲप 'या' फोनमध्ये होणार बंद

पुढारी ऑनलाईन : व्हॉट्सॲप (WhatsApp) लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र व्हॉट्सॲप अनेक डिव्हाइसमधून बंद होणार आहे. परंतु व्हॉट्सॲप वापरण्यासाठी डिव्हाइस बदलण्याची आवश्यकता आहे का? याबदृल व्हॉट्सॲपने माहिती दिली.

याबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपने सांगितले की, जुन्या आयफोनमधील व्हॉट्सॲप बंद होणार आहे. शिवाय जुन्या iOS वर चालणाऱ्या iPhone वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप सुरू ठेवण्यासाठी iOS अपडेट करावे लागेल.

तसेच व्हॉट्सॲप 24 ऑक्टोबरपासून iOS 10 आणि iOS 11 याही डिव्हाइसवर बंद होईल. त्‍यामुळे उद्यापासून या डिव्हाइसवर व्हॉट्सॲप काम करणार नाही. म्हणजेच तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करावा लागेल. कंपनीने iPhone 5 आणि iPhone 5s ला याबाबत सूचना दिल्या आहेत. या फोन वापरकर्त्यांना सांगण्यात आले आहे की व्हॉट्सॲप लवकरच त्यांच्या फोनवर काम करणे बंद करेल.

iPhone अजूनही iOS 10 आणि iOS 11 वर काम करत असल्यास ते अपडेट करावे. कंपनीने iOS 16 रिलीज केला आहे. तसेच नविन iPhones iOS 16 वर सुरू आहे. या आयफोन किंवा अँड्रॉइड वापरकर्त्यांचे व्हॉट्सॲप सुरू राहणार आहे.

whatsapp ने सांगितले…

व्हॉट्सॲपने म्हटले आहे की, सिस्टममधून व्हॉट्सॲप बंद होण्यापूर्वी व्हॉट्सॲप याबाबत सूचना देण्यात आल्‍या आहेत. आणि अपग्रेड करण्यासाठी सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे बंद होण्यापूर्वी iOS अपडेट कारावी असे व्हॉट्सॲपकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

WhatsApp Caption : व्हॉटस्अ‍ॅपवर फोटो, व्हिडीओ ‘फॉरवर्ड’ करताना असणार कॅप्शनही!  

WhatsApp : सावधान! व्हॉट्सअ‍ॅप क्लोन ठरत आहे धोकादायक; हेरगिरीच्या प्रमाणामध्ये वाढ 

WhatsApp : व्हॉट्स ॲप आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचे पाहा फायदे…

Back to top button