औरंगाबाद : क्रिप्टो ट्रेडिंगची भुरळ; दुप्पटच्या आमिषाने ७१ हजारांना बसला ऑनलाईन गंडा

औरंगाबाद : क्रिप्टो ट्रेडिंगची भुरळ; दुप्पटच्या आमिषाने ७१ हजारांना बसला ऑनलाईन गंडा
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टो ट्रेडिंगची भुरळ घालून अर्ध्या तासात दामदुप्पटचे आमिष दाखवून गुजरातच्या दोन भामट्यांनी महाराष्ट्रातील शेकडो नागरिकांना लाखोंचा ऑनलाईन गंडा घातला. कन्नड तालुक्यातील एकाने ७१ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर ग्रामीण सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तीन दिवस सुरतमध्ये मुक्काम ठोकून एका भामट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याचा साथीदार मात्र पसार झाला आहे.

सय्यद महंमद उनेस मियां हाफीज (30, रा. नानपुरा मार्केट, सुरत) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो केवळ आठवी पास आहे. यापूर्वी जुने मोबाईल खरेदी-विक्रीचे दुकान चालवीत होता. तो व्यवसाय चांगला चालत नसल्यामुळे, या मार्गाला लागल्याचे समोर आले. आठ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झालेला आहे. त्याचा साथीदार अबुबकर हा कुटुंबासह पसार झाला आहे.

पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितले, की कन्नड येथील एका तक्रारदाराने फिर्याद दिली होती. त्यावरून ऑगस्टमध्ये ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या मुलाने इन्स्टाग्रामवर क्रिप्टो ट्रेडिंग करून अर्ध्या तासांत पैसे दुप्पट करून मिळतात, अशी जाहिरात पाहिली. ही जाहिरात सय्यद उनेस या सायबर भामट्याची होती. त्या जाहिरातीला भुलून ७१ हजार ८० रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. भामट्यांनी ही रक्कम हडप करून फसवणूक केली होती. तेव्हापासून सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास सुरू होता. सुरतमध्ये तीन दिवस मुक्काम अन् आरोपीला बेड्या

पोलीस निरीक्षक अशोक घुगे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, भारत माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास कामठे, संदीप वरपे, नितीन जाधव, रवींद्र लोखंडे, सविता जायभाये, मुकेश वाघ, योगेश दारवंटे, शीतल खंडागळे यांच्या पथकाने ज्या इन्स्टाग्रामवरून जाहिरात करण्यात आली, त्याची तांत्रिक माहिती काढली. ते खाते गुजरातमधील सुरत येथून ऑपरेट होत असल्याचे समोर आले. यानंतर पथक सुरतला रवाना झाले. तेथे पथकाने तीन दिवस मुक्काम करून कोणत्या बँक खात्यात पैसे जातात, ते कोणत्या एटीएममधून काढले जातात, हे पैसे कोण काढते, यासह बरीच तांत्रिक माहिती मिळविली. त्यावरून आरोपी आणि त्यांचे वाहन निष्पन्न केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सायबर पोलीस उनेसपर्यंत पोचले. त्याला शिताफीने अटक केली. मात्र, ही खबर त्याचा साथीदार अबुबकर याला मिळताच तो कुटुंबियांसह पसार झाला.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news