Vandy Electric Car : केरळच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार पाहिली का…

Vandy Electric Car : केरळच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार पाहिली का…

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या इलेक्ट्रिक कार डिझाईनची खूप चर्चा आहे. तिरूवअनंतपूरमच्या (केरळ) बार्टन हिल या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही इलेक्ट्रीक कार बनवलेली आहे. Vandy असे या कारचे नाव आहे. या कारने नुकतेच शेल ईको-मॅराथॉन (SEM) २०२२ चा एनर्जी इफिशियंसी अ‍ॅवार्ड जिंकला आहे. ही स्पर्धा इंडोनेशियाच्या पर्टामिना मंडलिका येथे आयोजित केली होती. (Vandy Electric Car)

शेल इको-मॅराथॉन एक अंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेत अनेक देशांचे विद्यार्थी सहभाग घेतात. ICE (Internal Combussion Engine) आणि इलेक्ट्रीक अशा दोन्ही प्रकारातील कारचे डिझाईनच्या उत्पादनाची चाचणी या स्पर्धेत केली जाते. या स्पर्धेतील तिरूवअनंतपूरम येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कारचे डिझाईन खूप प्रसिद्धीस आले. पुरस्कार मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या टीमने माध्यमांशी संवाद साधला.

अ‍ॅवॉर्ड विजेता टिम

अ‍ॅवॉर्डसाठी विजेती ठरलेली टीम जीचे Pravega असे नाव आहे. महाविद्यालयाचे मॅकॅनिकलचे १९ विद्यार्थ्यांची ही टीम आहे. त्या पाच टीम पैकी आहे ज्यांना या स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. यामध्ये निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर त्यांची निवड करण्यात येते.

व्हँडी (Vandy) या प्रोटोटाईप इलेक्ट्रिक कारला बनविण्यासाठी जवळपास १० महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे सांगितले जात आहे. या कारचे वजन ८० किलोग्रॅम आणि टॉप स्पीड २७ किमी प्रति तास आहे. प्रवेगाच्या टीम लीडर कल्याणी एस. कुमार यांनी दिलेल्या माहिती नूसार "ही आमच्यासाठी खरोखरच एक मोठी संधी होती. या प्रकल्पामुळे आम्हाला आमच्या अभियांत्रिकी कौशल्यांचा वापर आणि विस्तार करण्याची एक अनोखी संधी मिळाली. शाश्वत आणि पर्यावरणपूरक विचार करून आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण केला. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. विशेषत: Asia Technologies, आम्ही या मिशनला सुरुवात करताना त्यांनी मार्गदर्शन केले."

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news