Gym Trainer Died Of Heart Attack : तरुण जीम ट्रेनरचा व्यायाम करताना हार्टअटॅकने मृत्यू | पुढारी

Gym Trainer Died Of Heart Attack : तरुण जीम ट्रेनरचा व्यायाम करताना हार्टअटॅकने मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीयांसाठी ह्रदयविकार रोग बहुदा आता सामान्य ठरत असावा असा प्रश्न पडू लागला आहे. कारण भारतात ह्रदयविकाराने ग्रस्त असणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यातही तरुणांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळत असल्याचे निरीक्षण आहे. असाच एक प्रकार उत्तरप्रदेश मधील गाझियाबाद येथे घडला आहे. येथील एका जीम मधील तरुण ट्रेनरचा व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. व्यायामाने मिळवलेल्या सदृढ शरीरयष्टीच्या लोकांना देखील ह्रदयविकार जडत असल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. (Gym Trainer Died Of Heart Attack)

गाझीयाबाद येथील शालीमार गार्डन भागात राहणारा ३५ वर्षांचा आदील त्याच भागात स्वत:ची जीम चालवत होता. जीम मधील इतर सभासदांना ट्रेन करण्याबरोबर तो देखिल नित्यनियामाने व्यायाम करत होता. तसेच त्याच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार फिटनेसला घेऊन तो नेहमी सजग होता. अलीकडेच त्याने पॉपर्टी खरेदी विक्रीचा नवा व्यवसाय सुद्धा सुरु केला होता. (Gym Trainer Died Of Heart Attack)

दररोज प्रमाणे आदीलने आपल्या जीममध्ये व्यायाम केला व विश्रांतीसाठी खुर्चीवर येऊन बसला. यावेळी पहाता पहाता तो खुर्चीवरच कलंडला. तिथे असलेल्या लोकांनी त्याला पाहिले आणि डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा खुर्चीतच बसल्या ठिकाणी मृत्यू झाला होता. हा सर्व प्रकार जीम मधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र वायरल होत आहे. आदीलच्या शरीरयष्टी आणि त्याच्या प्रोफशनकडे पाहता कोणी देखील म्हणू शकणार नाही की, अशा तंदुरुस्त व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून आदीलला सारखा ताप येत होता, तरी देखील तो व्यायाम करीत होता, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. (Gym Trainer Died Of Heart Attack)

या घटनेबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, ताप आल्यावर व्यायाम करु नये. जेव्हा ताप आलेला असतो तेव्हा ह्रदयावर सूज आलेली असते. अशा वेळी व्यायाम केल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. शिवाय अति व्यायाम सुद्धा शरीराला हाणीकारक ठरतो. त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांकडे ह्रदयाची तपासणी केली गेली पाहिजे.

अधिक वाचा :

Back to top button