बीड-केज रोडवर एसटी बस आणि पिकअपचा अपघात; एका मजुराचा मृत्यू | पुढारी

बीड-केज रोडवर एसटी बस आणि पिकअपचा अपघात; एका मजुराचा मृत्यू

केज; पुढारी वृत्तसेवा : केज-बीड रोडवरील मस्साजोग जवळ एसटी बस आणि पिकपच्या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१७) रात्री साडेआठच्या सुमारास झाला. अदिनाथ मच्छिंद्र घोळवे (वय ३० रा. मुंडेवाडी) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. तर बाबासाहेब शंकर ठोंबरे (वय ३६, रा. दहिफळ वडमाऊली) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे.

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास मस्साजोग जवळील हनुमंत पिंपरीकडे जाणाऱ्या फाट्या जवळ सोयाबीन काढणाऱ्या मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप (क्र. एम एच ३२ बी ९७३६) आणि धारूर आगाराची एसटी बसचा (एम एच-१४ बीटी २५१५) अपघात झाला. यामध्ये अदिनाथ घोळवे व बाबासाहेब ठोंबरेहे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान अजिनाथ याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, वैभव सारंग यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

हेही वाचा :

Back to top button