भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणे यांनी स्वत:वर गोळी झाडून संपवले जीवन | पुढारी

भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणे यांनी स्वत:वर गोळी झाडून संपवले जीवन

बीड; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.११) सकाळी ११ च्या सुमारास घडली. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मत्यू झाला.

बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. सर्वच क्षेत्रात त्यांचे ऋणानुबंध होते. खूप कष्टातून पुढे आलेल्या बियाणे यांनी नेमके हे टोकाचे पाऊल कशासाठी उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button