स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रत्येक श्वास स्वातंत्र्यासाठी घेतला : पंकजा मुंडे | पुढारी

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रत्येक श्वास स्वातंत्र्यासाठी घेतला : पंकजा मुंडे

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी भारतभूमीसाठी केलेले कार्य प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायक असून सावरकरांनी प्रत्येक श्वास स्वातंत्र्यासाठी घेतला. सावरकर हे भारतमातेवर प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व होय. त्यांचे विचार पुढील पिढीकडे जाणे गरजेचे असून अशा प्रकारची वास्तू युवकांना प्रेरणा देते असे मत पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी पेशवा प्रतिष्ठानने अतिशय नेत्रदीपक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले याचे देखील पंकजा मुंडेंनी कौतुक केले.

पेशवा प्रतिष्ठान अंबाजोगाईच्या पुढाकारातून सावरकर चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. याचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर खा.डॉ. प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, रमेश आडसकर, राम कुलकर्णी , गजानन मुडेगावकर,डॉ सुधीर धर्मपात्रे यांची उपस्थिती होती.

यावेळी वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पेशवा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची दखल घेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पेशवा प्रतिष्ठानला सामाजिक कार्यासाठी एक लाख रुपये देण्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कुलकर्णी यांनी केले. संचालन संकेत तोरंबेकर यांनी तर उपस्थितांचे आभार अक्षय पिंगळे यांनी मानले.

यांचा झाला सन्मान :

कार्यक्रमा दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या सुशोभीकरनासाठी काम केलेले मूर्तिकार दीपक पुडके, शिल्पकार बबन मस्के, पप्पू शेठ, उत्तेरेश्वर डाके, वैष्णव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा;

Back to top button