

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणा-या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( पीएफआय ) या वादग्रस्त संघटनेशी संबंधित दोन संशयितांना बुलढाण्यातून एनआयए व एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले. आज (दि. 27) सकाळी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीने ही छापेमारीची कारवाई करण्यात आली.
दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात 'पीएफआय'च्या देशभरांतील ठिकाणांवर मंगळवारी पुन्हा तपास संस्थांनी संबंधित राज्यांतील पोलिसांच्या मदतीने छापे टाकले. या छाप्यांदरम्यान दोनशेपेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे अथवा अटक करण्यात आली आहे.
बुलढाण्यातही आज एनआयए व एटीसच्या पथकाने दोघाही संशयितांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये आणले. यावेळी पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ) च्या काही स्थानिक समर्थकांनी पोलीस स्टेशन परिसरात कारवाईच्या निषेधार्थ नारेबाजी केली. पोलीसांनी त्या ११ समर्थकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा :