पीएफआयशी संबंधित दोघांवर नगरमध्ये कारवाई, नगर व संगमनेर येथून स्थानिक पोलिसांनी घेतले ताब्यात | पुढारी

पीएफआयशी संबंधित दोघांवर नगरमध्ये कारवाई, नगर व संगमनेर येथून स्थानिक पोलिसांनी घेतले ताब्यात

नगर, पुढारी वृत्तसेवा: पीएफआय अर्थात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून धाडसत्र सुरू आहे. पीएफआयशी संबंधित असलेल्या दोघांपैकी एकाला नगर शहरातील मुकूंदनगर तर दुसऱ्याला संगमनेर येथून स्थानिक पोलिसांनी मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी अटक केली आहे.

मोहम्मद खलील दिलावर शेख (संगमनेर), जुबेर अब्दुल सत्तार शेख (मुकूंदनगर, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पीएफआयवर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे आणि टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत. गेल्या आठवड्यात तपास यंत्रणांनी देशभरात छापेमारी करत या संघटनेच्या शंभरहून अधिक जणांना अटक केली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामी संघटनेत कार्यरत असलेल्या दोघांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. सदरची कारवाई भिंगार कॅम्प, संगमनेर पोलिसांनी केली आहे. मात्र, या कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेचे कोणतेही पथक नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

Back to top button