केज; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाकडून २५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. केज येथे धाड टाकून तब्बल २५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
अधिक वाचा-
केज तालुक्यात सर्वत्र किराणा दुकान, टपऱ्या अगदी चहाच्या ठेल्यावरही सर्रास बंदी असलेला गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक ए राजा स्वामी यांना मिळाली. त्यांनी विशेष पथकाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
अधिक वाचा-
त्यानुसार, विषेश पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दि. २ सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केज पोलीस स्टेशन हद्दीत धाड टाकण्यात आली. क्रांतीनगर भागात, वसंत महाविद्यालयाच्या उत्तरेस शेवाळे यांच्या घराच्या बाजूच्या गोडावूनवर छापा टाकला.
त्यात १७ लाख ४६ हजार २२० रु. किंमतीचा गुटखा मिळून आला. यामध्ये पप्पू कदम हा प्रतिबंधित गुटखा साठा करताना व विक्री करताना आढळून आला. त्याच्या विरुद्ध भा. द. वि. २७२, २७३ व ३२८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक वाचा-
तसेच रात्री ९:१५ वा. च्या सुमारास छापा टाकण्यात आला. केज पोलीस स्टेशन हद्दीत, खुरेशी मोहल्ला, दर्गा रोड, केज येथे गोडावूनवर छापा टाकला. त्यात ७ लाख २ हजार ८६० रुपये किमतीचा गुटखा मिळून आला.
यामध्ये अबुजर खैरउमिया खुरेशी हा प्रतिबंधित गुटखा साठा करताना व विक्री करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध भा. दं. वि. २७२, ३७३, ३२८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत एकूण २४ लाख ४९ हजार ८० रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला. केलेल्या कारवाईमुळे अवैद्य धंदे व गुटखा विक्री करणारे गुटखा किंग यांच्यात खळबळ माजली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ए राजा स्वामी यांच्या आदेशानुसार झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांची मदत मिळाली. त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केली.
हेदेखील वाचा-
पाहा व्हिडिओ- जपानी मुलगी बोलतेय चक्क मराठी | Japanese Girl Speaks Marathi