पैठण : नाथसागर धरणाचे दहा दरवाजे पुन्हा एक फुटानी उघडले | पुढारी

पैठण : नाथसागर धरणाचे दहा दरवाजे पुन्हा एक फुटानी उघडले

पैठण : पुढारी वृत्तसेवा- पैठण नाथसागर धरणाच्या वरील भागासह तालुक्यातील बुधवारी रोजी झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान धरणाचे दहा दरवाजे पुन्हा एकदा एक फूट खुले झाले. गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी घेतला आहे. त्यामुळे गोदावरी नदीत १४ हजार ६७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ५ हजार ५३५ नोंद झाली. सध्या धरणाची पाण्याची टक्केवारी ९८.९० आहे.

जून महिन्यापासून येथील नाथ सागर धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. मागील आठवड्यात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे २७ पैकी खुले करण्यात आलेले १८ दरवाजे बंद केले. दोन दरवाजातून वरील धरणातून येणारे पाण्याची आवक त्याच पद्धतीने विसर्ग करण्याचे नियोजन सुरू होते. मात्र बुधवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सह रात्री पैठण तालुक्यातील लोहगाव १२, पाचोड २५, नांदर ३४, बालानगर ११, ढोरकीन ८, बिडकीन ५, पिंपळवाडी(पिं) ६, पैठण ५ असे एकूण १०९ मी.मी पावसाची नोंद करण्यात आली. अशी माहिती नायब तहसीलदार गिरीजाशंकर आवळे यांनी दिली.

गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान धरणाचे २७ पैकी दरवाजे क्र.१० ते २५ असे एकूण दहा दरवाजे एक फूट उंचीवर स्थिर झाले. गोदावरी नदीत १४ हजार ६७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या नाथसागर धरणाची पाणी पातळी १५२१.८० फूट असून पाण्याची टक्केवारी ९८.९० आहे.

Back to top button