कोल्हापूर : शहर परिसरात मेघगर्जनेसह पाऊस | पुढारी

कोल्हापूर : शहर परिसरात मेघगर्जनेसह पाऊस

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर शहरासह परिसरात बुधवारी रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. पावसाने गणेश आगमन मिरवणुका पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने आज हजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. आज जिल्ह्याच्या काही भागात सकाळी पाऊस झाला. यानंतर कडकडीत ऊन पडले होते. शहरातही दिवसभर हवेत उष्मा जाणवत होता. सायंकाळी वातावरण ढगाळ झाले. काही वेळात ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.

दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग आज बंद करण्यात आला. सकाळी धरणातून 1 हजार 30 क्यूसेक विसर्ग सुरू होता. दुपारपासून तोही बंद करण्यात आला. सध्या दूधगंगा, कासारी, कडवी, जंगमहट्टी, जांबरे, आंबेओहळ याच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Back to top button