बुलढाणा : लपंडाव खेळताना जीवनाचा डाव हरला! १२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू | पुढारी

बुलढाणा : लपंडाव खेळताना जीवनाचा डाव हरला! १२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू

बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा – भावंडासोबत लपंडाव खेळताना लपण्यासाठी बाथरूममध्ये गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाय घसरला. तेथे लटकलेल्या ओढणीचा गळफास लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही मन हेलावणारी ही घटना खामगाव शहरातील समर्थ नगरात मंगळवारी दुपारी घडली.

प्रणित दिलीप इंगळे (वय १२) हा घराच्या बाथरूममध्ये लपण्यास गेला असता धावपळीत तेथे घसरून पडल्याने ओढणीत त्याची मान अडकली हे दिसून आली. कुटूंबीयांनी प्रणितला तात्काळ सामान्य रूग्णालयात नेले. परंतु, तेथील तपासणीत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या आकस्मिक दु:खद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button