काेल्हापूर : अंबपवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी | पुढारी

काेल्हापूर : अंबपवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

कासारवाडी ; पुढारी वृत्तसेवा : अंबपवाडी (ता. हातकणंगले) येथे शेतात जनावरांना चारा आणण्यास गेलेल्या शेतकर्‍यावर गव्याने हल्‍ला केला. यात एक शेतकरी जखमी झाला तर दुसरा बचावला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

सकाळी साडेसात वाजता जनावरांना चारा आणण्यासाठी रंगराव श्रिवराम खोत गेले होते. चारा सायकलीवर ठेवताना गव्याने पाठीमागून त्यांच्यावर हल्‍ला केला. यावेळी खोत बांधावर पडले. जवळच युवराज खोत मोटारसायकल घेऊन चारा आणण्यासाठी गेले होते. त्यांनी आपल्या दिशेने गवा येताना पाहून मोटारसायकल टाकून पळ काढला. खोत यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. गव्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गव्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.

Back to top button