हिंगोली : सेनगाव येथे चोरट्यांचा तीन लाख रुपयांच्या तूरडाळीवर डल्ला | पुढारी

हिंगोली : सेनगाव येथे चोरट्यांचा तीन लाख रुपयांच्या तूरडाळीवर डल्ला

सेनगाव (जि. हिंगोली) : पुढारी वृत्तसेवा : सेनगाव येथे चोरट्यांनी तीन लाख रुपयांच्या तूरडाळीवर डल्ला मारला. याप्रकरणी तिरुपती जिनिंगचे मालक द्वारकादास भाऊ सारडा व केदारची सारडा यांनी सेनगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने शोध घेतला. मात्र अपेक्षित यश आले नाही.

सेनगाव ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सेनगावपासून तीन किलोमीटर अंतरावर तिरुपती जिनिंग आहे. येथील गोडाऊनमध्ये तुरीच्या साठवणूक करण्यात आली. बुधवार, १७ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर वाकवून आत प्रवेश केला. गोडाऊनमधील जवळपास ७० ते ७२ तूर कट्टे चोरट्यांनी लंपास केली.

दरम्यान, या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिसात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक रजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण करीत आहेत.

हेही  वाचा : 

Back to top button