देशप्रेमी रिक्षा चालकाची स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रवाशांना मोफत सेवा | पुढारी

देशप्रेमी रिक्षा चालकाची स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रवाशांना मोफत सेवा

अणदूर; लक्ष्मण नरे : प्रत्येकाच्या मनात देश प्रेमाची भावना असतेच; पण कोण कधी कशाप्रकारे व्यक्त करील हे सांगता येत नाही. अणदूर बसस्थानकावर असाच एक देशप्रेमी रिक्षाचालक स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रवाशांना मोफत सेवा देत आहे. दिनेश कुताडे असे रिक्षाचालकाचे नाव आहे. ‘स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत सेवा’ असा आवाज देत लोकांना मोफत घरापर्यंत पोहोच करत आहे.

दिनेश कुताडे याची अणदूर बसस्थानकावरील रिक्षा थांबावर रिक्षा असते. येथून अणदूर व अणदूर-नळदुर्ग गावच्या मार्गावर त्याची रिक्षा धावते. यामधून त्याला दिवसाकाठी सुमारे तीनशे ते चारशे रुपये मिळतात. यावरच तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याने आज स्वातंत्र्य दिनानिम्मित्त सकाळी 9 ते रात्री ८ पर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचा संकल्प केला आहे. त्याच्या या देशप्रेमाचा उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, बाबुराव मुळे, करबसप्पा धमुरे, अनील घुगे, दयानंद मुडके, शिवशंकर तिरगुळे, पद्माकर जेवळे यांनी गौरव केला. अनेकांनी मोफत सेवेबद्दल आभारही मानले. त्याच्या या अनोख्या देशभक्तीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button