नेवाळी : ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी आदिवासींची भटकंती | पुढारी

नेवाळी : ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी आदिवासींची भटकंती

नेवाळी;  पुढारी वृत्तसेवा :  ठाणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणी ग्रामपंचायातींकडे पहिले जाते. ग्रामपंचायत हद्दीत
मोठं मोठे गृहसंकुलांचे प्रकल्प देखील उभे राहिले आहेत. मात्र प्रत्यक्षात गावात पाण्यासाठी आदिवासी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली असल्याचे ह्दय द्रावक चित्र समोर आले आहे. गावात पाणी पुरवठा योजना सुरु असून देखील पाणी मिळत नसल्याने आदिवासीं महिलांना बाहेरून पाणी आणण्याची वेळ भर पावसाळ्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील खोणी ग्रामपंचायतीची वाटचाल स्मार्ट ग्रामपंचायतीकडे सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात गावात पाणी पुरवठा योजना सुरु असून देखील पाणी मिळत नसल्याने डोक्यावरून बाहेरून पाणी आणण्याची वेळ आदिवासीनी महिलांवर आली आहे. एकीकडे देश
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मात्र ज्या ठाणे जिल्ह्याला आता मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. त्याच मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे ग्रामपंचायतीची सत्ता आहे. मात्र प्रत्यक्षात गावात पाणी मिळत नसल्याने आदिवासी महिला आजूबाजूच्या परिसरात पाण्यासाठी
भटकंती करत आहेत. याआधी देखील दैनिक पुढारीने गावातील पाण्याच्या समस्येला वाचा फोडली होती. यानंतर सुरळीत झालेले पाणी पुरवठा पुन्हा अचानक कमी कसा झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाहेरून पाणी आणण्याची वेळ

गावातील नागरिकांना येणार्‍या पाण्याची पळवणूक तर होत नाही ना ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीचे सदस्य मुकुंद ठोंबरे आणि जयश्री ठोंबरे यांनी देखील प्रशासनाच्या निदर्शनास पाण्याची टंचाई आणून दिली होती. मात्र
आता पुन्हा पाणीच मिळत नसल्याने डोक्यावरून पाणी भरण्याची वेळ आदिवासी महिलांवर आली असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.

Back to top button