ठाणे : आटगाव रेल्वेस्थानकाजवळ भागलपूर एक्सप्रेसची कप्लिगं तुटली | पुढारी

ठाणे : आटगाव रेल्वेस्थानकाजवळ भागलपूर एक्सप्रेसची कप्लिगं तुटली

कसारा ; पुढारी वृत्तसेवा  : आसनगाव आटगाव दरम्यान आज (दि. १५) सकाळी साडेनऊच्या सुमारास मालगाडी बंद पडल्याने
दीड तास कसार्‍याकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली.  11 वाजता मालगाडी दुरुस्त झाल्‍यानंतर कसाराकडे येणारी वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर अवघ्या 10 मिनटात कसाराकडे निघालेल्या भागलपूर एक्सप्रेस ने आटगाव स्टेशन सोडल्यावर किलोमीटर
क्रमांक 92 जवळ अचानक भागलपूर एक्सप्रेसचे इंजिनपासून तिसर्‍या बोगीचे कपलिंग तुटून एक्सप्रेसचे काही डबे
आटगाव दिशेने थांबले तर 3 डब्बे व इंजिन कसारा दिशेकडे थांबले.अचानकच्या या प्रसंगामुळे भागलपूर एक्सप्रेस मधील शेकडो प्रवासी भयभीत झाले होते. काही दुर्घटना झाली म्हणून काही प्रवासी गाडीतून खाली उतरले होते.

न दीड तासाच्या अथक प्रयत्ना नंतर रेल्वेच्या कसारा येथील कर्मचार्‍यांनी जाऊन भागलपूर एक्सप्रेसचे कपलिंग जोडले व लोकमान्य टिळक टर्मिनस मुबई भागलपूर एक्सप्रेस दुपारी 12 : 45 वाजता कसार्‍याकडे रवाना केली.  दरम्यान गाडी भरधाव वेगात असताना भागलपूर एक्सप्रेसचे 3 डब्ब्यापासूनचे कपलिंग तुटून डब्बे वेगवेगळे झाले होते. परंतु हे डब्बे वेगळे झाल्यानंतर रुळावरून खाली न घसरता तात्काळ जागीच थांबले होते.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्व डबे रुळावरच

मध्य रेल्वेच्या आधुनिक यंत्रणेद्वारे अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यात कपलिंग तुटून काही घटना घडू नये म्हणून कपलिंग लगत असलेल्या एअर व्ह्याकुंम प्रेशर पाईपला मेल एक्सप्रेसच्या सर्व डब्ब्यांच्या ब्रेकशी संलग्न केले आहे. जेव्हा एखाद्या मेल एक्स्प्रेसचे कपलिंग तुटते तेव्हा या एअर प्रेशर पाईप मधील हवा लगेचच पूर्णपणे लिक होते व ती हवा लिक झाली की आपघात ग्रस्त एक्सप्रेसचे डब्बे हळूहळू जागीच थांबले जातात. त्यामुळे कपलिंग जरी तुटली तरी डब्बे रुळावरून खाली घसरत तर नाहीत. त्यामुळे मोठा दिलासा प्रवाशाना मिळत आहे. भागलपूर एक्सप्रेसच्या डब्ब्यांना प्रेशर पाईपची सुविधा नसती तर डब्बे रेल्वे रुळावरून घसरले असते  परिणमि मोठी दुर्घटना घडली असती.

Back to top button