लातूर : जीवनाच्या घडीपेक्षा राष्ट्रध्वजाच्या घडीची काळजी, पानचिंचोलीच्या वरटे कुटुंबियाकडून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री | पुढारी

लातूर : जीवनाच्या घडीपेक्षा राष्ट्रध्वजाच्या घडीची काळजी, पानचिंचोलीच्या वरटे कुटुंबियाकडून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री

निटूर; विजय देशमुख : देशाचा सन्मान अन् देशवासियांसाठी जीव की प्राण असलेला तिरंगा ध्वज मोफत धुवून व इस्त्री करुन देण्याचा वसा पानचिंचोली (जि.लातूर) येथील लाँन्ड्री चालकाने जपला आहे. रमेश गणपती वरटे असे या लाँन्ड्रीचालकाचे नाव असून त्यांच्या परिवाराने तब्बल दोन पिढ्यांपासून ही परंपरा जपली आहे.

रेमश वरटे यांना तिरंग्याच्या या सेवेचा वसा व वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. स्वातंत्र्यासाठी अनेकांच्या बलिदानाने फडकत असलेल्या तिरंग्याचे पावित्र्य जपणे आणि स्नमान राखणे ही आपली जबाबदारी तसेच कर्तव्यही आहे. देशसेवा म्हणून दरवर्षी राष्ट्रीय सणाला ध्वज मोफत धुवून व इस्त्री करुन वरटे कुटुंब देतात. १५ आॕगस्ट, २६ जानेवारी, मराठवाडा मुक्ती दिन या राष्ट्रीय सणांना पानचिंचोली व परिसरातील सुमारे १५ गावांमधील तिरंगा ध्वज ते धुवून देतात. जगण्याची घडी विस्कटली तरी चालेल पण प्राणाहून प्रिय असलेल्या राष्ट्रध्वजाची घडी विस्कटता कामा नये यासाठी रमेश वरटे व त्यांची पत्नी मिराबाई वरटे ही अनोखी देशसेवा बजावत आहेत.

हेही वाचा :

Back to top button