विनायक मेटे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात केला होता स्वत: विवाह... | पुढारी

विनायक मेटे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात केला होता स्वत: विवाह...

बीड : विनायक मेटे हे सामाजिक कामे आणि समाजाच्या लढ्यात नेहमी पुढे असायचे. याचे एक उत्तम उदाहण होते सामुदायिक विवाह सोळ्याची चळवळ उभारून स्वतः सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह केला होता.

गोरगरीब, शेतकरी, ऊसतोड मजूर कुटुबांची मुलींचे विवाह करताना खूप परवड होते. अर्थिक परिस्थिती मुळे मुलींचा विवाह करताना कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर पडतो. सामान्य माणसाची ही अडचण लक्षात घेऊन विनायकराव मेटे यांनी राज्यस्तरावर सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ उभा केली.

लोकांनी सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला- मुलींचे विवाह करावेत, सामुदायिक विवाह सोहळ्याला चळवळीचे स्वरूप यावे यासाठी विनायक मेटे यांनी स्वत: आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात स्वत:चा विवाह केला. यामुळे नंतरच्या काळात सामुदायिक विवाह सोहळ्याला लोक चळवळीचे स्वरूप आले. विविध प्रतिष्ठाणे, राजकीय नेत्यांनी पुढे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. परंतू सामुदायिक विवाह सोहळ्याचे खरे जनक हे विनायकराव मेटे हे होते.

सामुदायिक विवाह सोहळे घेण्यात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. हजारो गोरगरीब कुटुंबातील युवक आणि युवतींचे त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह लावून दिले. हजारो संसार त्यांनी जोडले. विनायकराव मेटे हे जोडणारे होते. कायम त्यांनी माणसेच जोडली. सामाजिक लढे लढले, समाजासाठी संघर्ष केला. विनायकराव मेटे यांनी उभा केलेली सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ ही संसार जोडणारी आणि गोरगरीबांचे संसार जोडणारी चळवळ होती.

Back to top button