मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बनला मृत्यूचा सापळा! ३ वर्षात ७१४ अपघात, २४६ जणांचा गेला बळी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बनला मृत्यूचा सापळा! ३ वर्षात ७१४ अपघात, २४६ जणांचा गेला बळी
Published on
Updated on

नवी मुंबई; राजेंद्र पाटील : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गावर गेल्या तीन वर्षात एकूण ७१४ अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यातील सुमारे २०७ गंभीर स्वरूपाच्या अपघातांमध्ये २४६ जणांचे मृत्यू झाले. तर ३८७ जण गंभीर जखमी झाले. २०२१ मध्ये ७१ गंभीर अपघातांत ८८ जण दगावले.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. यामध्ये भीषण, गंभीर अपघात मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. एक्स्प्रेस वेवर २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ७१४ अपघात झाले. त्यापैकी २०७ अपघात भीषण, गंभीर स्वरूपाचे आहेत. यामध्ये २४६ जणांचा मृत्यू तर ३८७ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर सुमारे ६२ किरकोळ अपघात आहेत. २०१९ मध्ये ७४ गंभीर अपघात झाले. त्यामध्ये ९२ जणांचा मृत्यू झाला. तर १६२ जण गंभीर जखमी झाले. २०२० मध्ये ६२ गंभीर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये ६६ जणांचा मृत्यू तर ७९ जण गंभीर जखमी झाले. २०२१ मध्ये ७१ गंभीर अपघातात ८८ जणांचा मृत्यू झाला. एक्स्प्रेस वे मार्गावर टायर फुटणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, लेन कटिंग करणे, ओव्हरटेक करणे यासह अन्य घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. हे अपघात रात्री आणि पहाटेच्या वेळी सर्वाधिक झाल्याचे महामार्ग पोलीस सांगतात.

२०२१ मध्ये राज्यात एकूण १२ हजार ५५३ गंभीर अपघात झाले असून १३ हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला. तर १० हजार ८७७ जण गंभीर जखमी झाले असून १३ हजार ५२८ जण दगावले. एकूण मृत्यू आणि जखमी व्यक्तींचा आकडा हा ३६ हजार ५९७ एवढा आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर ३ हजार ६०७ गंभीर अपघात झाले. त्यापैकी ३ हजार ९९२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २ हजार ३३९ जखमी झाले. राज्य महामार्गावर ३ हजार १५१अपघातात ३ हजार ४११ मृत्यू तर २ हजार ४९ जखमी झाले. इतर मार्गावर ५ हजार ७२४ अपघातात ६ हजार ३७ प्रवाशी तसेच सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून ६ हजार ४३५ जखमी झाले आहेत.

हेहा वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news