विरोधकांना संपविण्याचे भाजपचे षड्यंत्र : आमदार प्रज्ञा सातव | पुढारी

विरोधकांना संपविण्याचे भाजपचे षड्यंत्र : आमदार प्रज्ञा सातव

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा: सत्तेसाठी हापापलेल्या भाजपने विरोधकांना संपविण्यासाठी नैतिक पातळी सोडली असून षड्यंत्र रचले आहे. परंतु सत्य परेशान हो सकता है पराजित नही. भाजप सरकारने कितीही चौकशा आणि आरोप लावले तरीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी निर्दोष आहेत, हेच सिद्ध होईल, असा विश्वास आमदार प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केला.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ आज (दि.२७) काँग्रेस पक्षाच्या वतीने औंढा नागनाथ येथे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात ईडीचा वापर करून गेल्या दोन दिवसांपासून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करीत आहे. परंतु या दबावाला आम्ही कधीही बळी पडणार नाहीत. या देशाच्या लोकशाहीसाठी संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि जनता सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भाजपने कितीही शक्ती लावली तरी सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी आम्ही कायम उभे आहोत.

औंढा नागनाथ येथे झालेल्या आंदोलनात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष मुनिर पटेल काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, नगरसेवक अज्जु ईनामदार, अजीज कादरी, सुरेश जावळे, अरुण देशमुख, स्वाती वाखरकर, केशवराव नाईक, विलास गोरे, नगरसेविका कुंताबाई गोबाडे, युवक काँग्रेस अध्यक्ष बालाजी कर्डिले, काँग्रेस अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष सुमेध मुळे, बाळु देशमुख, पंकज जाधव, विक्की देशमुख, बालाजी कर्डिले, भोलासिंग दरोगा, संतोष साबळे, विठ्ठल जाधव, अक्षय डाखोरे, बंडु काळे, ज्योती धुळे, फारुख पठाण, शेख अनिस, मारोती शिंदे, संभाजी बेले, प्रविण सरकटे, जावेद इनामदार आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button