हिंगोलीत ईडीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने; जोरदार घोषणाबाजी | पुढारी

हिंगोलीत ईडीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने; जोरदार घोषणाबाजी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना समन्स बजावून त्यांची चौकशी करण्यामागे केंद्र सरकारचे दडपशाहीचे धोरण असल्याचा आरोप करीत हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता ईडी व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हिंगोली येथील महात्मा गांधी चौकामध्ये हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात माजी नगरसेवक अनिल नेनवाणी, बापुराव बांगर, मिलींद उबाळे, सुरेश सराफ, शेख निहाल, शोभाबाई मोगले, शेख सलीम, विशाल घुगे, मुजीब कुरेशी, ओमप्रकाश देशमुख, शेख माबूद, बाळू कदम, अबेदअली जहागिरदार, बासीत मौलाना, शेख जुबेर, संतोष साबळे, शहबाज पठाण, शेख वाजीद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स बजावून त्यांना वारंवार चौकशीला बोलावून केंद्र सरकार दडपशाहीचे धोरण राबवित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. केद्रातील तपास यंत्रणांना हाताशी धरून केंद्र सरकार कट कारस्थान करीत असल्याचा आरोप करून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकाराचे हेच धोरण कायम राहिल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button