बीड : दुबार पेरणीचे सोयाबीन गोगलगायीने केले फस्त, शेतकरी चिंताग्रस्त | पुढारी

बीड : दुबार पेरणीचे सोयाबीन गोगलगायीने केले फस्त, शेतकरी चिंताग्रस्त

नेकनूर; पुढारी वृत्तसेवा: पहिल्यांदा पेरलेले सोयाबीन गोगलगायीच्या संकटाने मोठ्या प्रमाणात संपल्याने विरळ झाले. त्यामुळे केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथील काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र, त्यालाही गोगलगायीने कवेत घेतल्याने शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे.

महागडे बियाणे, औषधे, पेरणी खर्च पाहता दुबार पेरणी शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. मात्र, यावर्षी अनेक ठिकाणी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना नाईलाजाने दुबार पेरणी करावी लागली. यानंतर ही अनेक ठिकाणी या पिकांना गोगलगायनी फस्त केले. यामुळे पुन्हा एकदा शेत रिकामे झाले. दोन वेळा केलेली पेरणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शेतातील या गोगलगायीमुळे हातातोंडाशी आलेले पीक दोन वेळा वाया गेले आहे. दोन वेळेच्या पेरणीसोठी खूपच खर्च झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे शेतकरी चंद्रकांत आरकडे (बोरगाव ) यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button