मराठवाडा
जालना : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीने खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव सपकाळ; पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. अमोल सपकाळ (वय 30) असे त्याचे नाव आहे. पत्नी व तिच्या भावाने हत्या केल्याचा आरोप अमोलच्या वडीलांनी केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल जालना शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीत राहत होता. आज सकाळी अमोलचा भाऊ त्याला भेटण्यासाठी आला होता. यावेळी त्याला अमोलचा मृतदेह दिसला. या घटनेची नोंद कदीम जालना पोलीस ठाण्यात झाली असुन अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा :

