आमदार प्रताप सरनाईकाच्या पुत्राची युवासेनेतून हकालपट्टी | पुढारी

आमदार प्रताप सरनाईकाच्या पुत्राची युवासेनेतून हकालपट्टी

ठाणे; पुढारी वृत्तसेवाः आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक याची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहीती समोर येत आहे. शिंदे गटाशी सलगी तसेच शिंदे गटात सामील झालेल्यांवर शिवसेनेकडून कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. अशातच पुर्वेश सरनाईकांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक शिवसेना पदाधिकारी हे शिंदे गटात सहभागी झाले. तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गद्दार शिवसैनिकांवर कारवाईचा बडगा उचलला. आदित्य ठाकरे यांनीही आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक याची युवासेनेतून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button