जालना : दोन कुटुंबातील वाद बेतला जीवावर, हाणामारीत मायलेकांचा मृत्यू | पुढारी

जालना : दोन कुटुंबातील वाद बेतला जीवावर, हाणामारीत मायलेकांचा मृत्यू

सेवली; पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील सेवली जवळच्या एरंडवडगाव येथे दोन कुटुंबांतील हाणामारीत मायलेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुमनबाई देवीलाल सिल्लोडे (वय ५५) व मंगेश देवीलाल सिल्लोडे (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद सेवली पोलिस ठाण्यात झाली आहे.

याप्रकरणी विजय शिंदे, सुधाकर शिंदे, शितल शिंदे, तुकाराम शिंदे, छकुली शिंदे, रंजना पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडवडगाव येथे नवीन तांडा वसला आहे. त्यांच्यातील सिल्लोडे व शिंदे कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून शुक्रवारी रात्री वाद झाला. यामध्ये सुमनबाई व मंगेश गंभीर जखमी झाले. त्यांना सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, सेवली पोलीस ठाण्याचे एन. एन. उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

हेही वाचा :

Back to top button