

नवी दिल्ली; पुढारी वृत्तेसवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर सीएनजी स्टेशनच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम,नैसर्गिक वायू मंत्री हरीदीप सिंह पुरी यांनी दिली. २०१४ मध्ये देशात ९०० सीएनजी स्टेशन होती. सध्या देशात ४ हजार ५०० हून अधिक स्टेशन्स उभारण्यात आले असून, येत्या दोन वर्षात ही संख्या ८ हजारांपर्यंत पोहोचेल,असा दावा पुरी यांनी केला. पाईप नॅचरल गॅस (पीएजनी) जोडण्यांची संख्यादेखील २०१४ मध्ये असलेल्या २४ लाखांच्या तुलनेत ९५ लाखांवर पोहचली आहे.
शहर वायू वितरण संबंधित सुधारणा पूर्ण झाल्यानंतर,देशातील ९८% लोकसंख्येला आणि त्यांच्या भौगोलिक क्षेत्राच्या ८८% लोकांना नैसर्गिक वायू उपलब्ध होईल. वायू-आधारित अर्थव्यवस्थेची सुरुवात करण्यासाठी, पंतप्रधानांनी प्राथमिक ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा १५% पर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे.२०७० पर्यंत देशाचे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्यात वायू-आधारित अर्थव्यवस्थेचा विकास महत्त्वाची भूमिका बजावेल,असा विश्वास पुरी यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नुकतेच देशातील १४ राज्यातील ४१ भागात १६६ सीएनजी स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. ४०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सीएनजी स्टेशनमुळे गॅस आधारित पायाभूत सुविधा आणि स्वच्छ इंधनाची उपलब्धता अधिक बळकट होईल शिवाय सीएनजी वाहनांच्या बाजारपेठेला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पुरी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :