परभणी : चारठाणा येथे बकरी ईद उत्साहात | पुढारी

परभणी : चारठाणा येथे बकरी ईद उत्साहात

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : पावसाने हजेरी लावल्यामुळे बकरी ईदची नमाज सर्व मशीदमध्ये अदा करण्यात आली. यावर्षी पावसाचे आगमन झाल्यामुळे ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली नाही. रविवारी (दि.१०) सकाळी आठ वाजता मदिना मशीदमध्ये मौलाना मोहम्मद इलियास यांनी बकरी ईदची नमाज पठण केली.

यावेळी तय्यब मौलाना, हाजी सादिक, मिया देशमुख, सय्यद अख्तर, सय्यद मुजीब, अहमद हाजी, बशीर खा. पठाण, सय्यद मुजाहिद, तहसील देशमुख, शेख अफसर सावकार, माजी उपसरपंच तहसीन देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.

हेही वाचा:

Back to top button