हिंगोली- सेनगाव महामार्गावर भरधाव कार उलटून एक ठार, तीन जखमी | पुढारी

हिंगोली- सेनगाव महामार्गावर भरधाव कार उलटून एक ठार, तीन जखमी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: हिंगोली ते सेनगांव महामार्गावरील गीलोरी पाटीजवळ भरधाव कार रस्त्याच्या खाली उलटून अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर ३ जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी( दि.३) पहाटे घडली आहे. संदीप वानखरे (रा. औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे.

संदीप वानखरे व त्याचे तीन मित्र हिंगोली येथे कारने ( एमएच २० एफ.वाय. ५९०१) मित्राच्या लग्नासाठी येत होते. औरंगाबादहून रात्रीच्या सुमारास ते सेनगाव मार्गे हिंगोलीकडे जात होते. याच दरम्यान रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार गिलोरी पाटीजवळ आली असताना तेथील एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्याच्या खाली शेतात जाऊन उलटली. संदीप वानखरे यांचा मृत्यू झाला. तर अजय शिवाजी जाधव (रा.अहमदनगर), कुलदीप नारायण कदम (रा. औरंगाबाद), हितेश राजेंद्र पवार ( रा. चाळीसगाव) हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळतात नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.बी. पोटे, जमादार हेमंत दराडे, पांडुरंग डवले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी हिंगोली येथील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीसात नोंद झालेली नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button