वाळकी : कार-ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू | पुढारी

वाळकी : कार-ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू

वाळकी : नगर-पुणे महामार्गावर चास गावच्या शिवारात कार दुभाजकाला धडकून व दुसर्‍या बाजूला जाऊन ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि.1) सायंकाळी 7 च्या सुमारास झालेल्या या अपघातात विजय संतोष पवार (वय 35, रा. म्हसणे बुद्रुक, ता. शिरूर) हे मृत झाले. मृत पवार व त्यांचा सहकारी असे दोघे कारने नगरहून पुण्याकडे जात होते.

शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास चास शिवारातील घुंगार्डे वस्तीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाऊन पुण्याहून नगरकडे येणार्‍या ट्रकवर आदळली. त्यामुळे कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी पवार यांना मृत घोषित केले. जखमीवर उपचार सुरू आहेत. नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button