ग्राम सचिवालयांच्या बांधकामाचा घेतला जाणार आढावा | पुढारी

ग्राम सचिवालयांच्या बांधकामाचा घेतला जाणार आढावा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेकडून स्व. आर. आर. पाटील ग्राम सचिवालय बांधकाम योजना सुरू करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली असून, जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायत कार्यालये उभारण्यात येणार आहेत. प्रशासनाने या कामांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून, कामकाजाचा आढावा घेण्यासाठी येत्या सोमवारी (दि.4) बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारती नाहीत;

तसेच इमारती बांधण्यासाठी त्यांच्याकडे निधी किंवा जागा नसल्याने ग्रामसचिवालय बांधता येत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद स्वनिधीतून या ग्रामपंचायतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झालेल्या गावचे सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता, विस्तार अधिकार्‍यांची बैठक 4 जुलै रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण भवन येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे
यांनी दिली.

भोरमध्ये सर्वाधिक ग्रामसचिवालये…
भोर तालुक्यातील सर्वाधिक 38 ग्रामसचिवालयांंचा समावेश आहे. जुन्नरमधील 15, मुळशी दहा, वेल्हा 11, आंबेगाव सात, खेड नऊ, इंदापूर आणि पुरंदरमध्ये प्रत्येकी आठ, मावळ आणि शिरूरमध्ये प्रत्येकी तीन, तर दौंड आणि हवेली तालुक्यात प्रत्येकी एका ग्रामसचिवालयाचा समावेश आहे. ही कामे मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Back to top button