भंडारा : कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्‍महत्‍या | पुढारी

भंडारा : कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्‍महत्‍या

भंडारा; पुढारी वृत्‍तसेवा कर्ज आणि आजारपणामुळे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा तालुक्यातील आमगाव दिघोरी येथे घडली. या घटनेची नाेंद कारधा पोलिस ठाण्यात झाली आहे. दिलीप परसराम वाघाडे (वय ५०, रा.आमगाव दिघोरी ) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे.

दिलीप यांची पत्नी काही वर्षांपूर्वी मृत्‍यू झाला असून, ते त्यांच्या २ मुलींसोबत रहात होते. ते पॅरॅलिसिसच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्याकडे थोडीशी शेती होती. शेतीसाठी त्यांनी काही कर्जही घेतले होते; पण आजारपणामुळे त्यांना शेती कसने जमत नव्हते. त्यामुळे कर्ज फेडणे कठीण झाले होते. त्यामुळे कंटाळून त्यांनी दि.२९ जून रोजी विषारी औषध प्राशन केले होते. तेव्हापासून ते सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल होते. उपचारादरम्यान शनिवारी ( दि.२ ) त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचलं का? 

Back to top button