पिंपरी : अल्पवयीनवर अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा | पुढारी

पिंपरी : अल्पवयीनवर अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली. ऋषिकेश श्रीकांत कांबळे (22, रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीने बुधवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना एप्रिल 2021 ते 29 जून 2022 या कालावधीमध्ये मैत्री लॉज, यमुना नगर, निगडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश याने अल्पवयीन फिर्यादी हिला लग्नाचे वचन देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. यामुळे तिने माझ्यासोबत लग्न कर अशी विनंती आरोपी ऋषिकेश याला केली. मात्र, आरोपी कांबळे याने फिर्यादी तरुणी सोबत लग्न करण्यास नकार दिला. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.

Back to top button