पिंपरी : दारू अड्ड्यावर छापा; दोन महिलांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : दारू अड्ड्यावर छापा; दोन महिलांवर गुन्हा

पिंपरी :  हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचा माल जप्त केला. याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिरगाव पोलिसांनी पवना नदीकाठी बुधवारी (दि. 29) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिस नाईक नवनाथ बाळासाहेब धायगुडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांना आरोपी महिला बेकायदा कच्च्या रसायनाची हातभट्टी दारू तयार करीत असताना मिळून आल्या. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे तीन हजार लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले आहे. शिरगाव पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button