नगर : बनावट दस्तावेजावर प्लॉटची परस्पर विक्री | पुढारी

नगर : बनावट दस्तावेजावर प्लॉटची परस्पर विक्री

नगर : पुढारी वृत्तसेवा : खरेदीखताचा बनावट तयार करून वृद्धाच्या प्लॉटची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. नागरदेवळे (ता.जि.नगर) येथील एका प्लॉटची बनावट दस्तऐवजाआधारे विक्री करण्यात आली असून चारजाणांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिझवान ईस्माइल सय्यद, शेख इम्रान, सय्यद मुजाहिद (सर्व रा. भिंगार), अ‍ॅड.तनवीर महेमुद शेख (रा.गोविंदपुरा) आणि खरेदीसाठी उभा केलेला बनावट इसम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अर्जुन जगन्नाथ बंगाळ (75, रा. सहकारनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा नागरदेवळे येथे 142.44 चौ.मी. लेआऊट मंजूर प्लॉट आहे. बंगाळ हे पत्नीसह पुणे येथे वास्तव्यास असून 15 जून रोजी ते प्लॉट पाहण्यासाठी आले होते.

त्यावेळी प्लॉटवर गाळ्यांचे दुमजली बांधकाम झाल्याचे निर्दशनास आले.aदरम्यान फिर्यादी हे संबंधिताना भेटले असता बिल्डर अली अकबर, अस्लम खान आणि सोएब शेख यांनी चार वर्षापूर्वी प्लॉट मालकाकडून विकत घेऊन आम्हाला विकल्याचे सांगितले. त्यानंतर बिल्डर अली अकबर याला विचारणा केली असता मी चौकशी करून अडचण सोडवितो अशी बतावणी केली. सर्व आरोपींनी संगनमत करून बनावट खरेदी खत बनवून प्लॉटची विक्री केल्याचे लक्षात आल्यानंतर बंगाळ यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button