

वसमत; पुढारी वृत्तसेवा : परभणी रोडवरील तालुका कृषी कार्यालय परिसरात ४० वर्षीय व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेषपाल नागोराव लोखंडे (रा. गोविंद नगर, कौठा रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी रोडवर तालुका कृषी विभागाचे कार्यालय आहे. या परिसरात जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
हेही वाचलंत का?