काहीही करा, माझ्या पोराला पुन्हा पहिलीतच ठेवा गुरुजी !; पालकांची विनवणी | पुढारी

काहीही करा, माझ्या पोराला पुन्हा पहिलीतच ठेवा गुरुजी !; पालकांची विनवणी

गेवराई : गजानन चौकटे : कोरोना महामारीमुळे सन २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षातील शैक्षणिक सत्रात मुलांना शाळेच्या बाकावर बसून शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे विशेषतः पहिली दुसरीतील मुलांना शिक्षणाची म्हणावी, तशी गोडी लागली नाही. आता नवे शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू होत आहे. जी मुले दुसरी किंवा तिसरीत गेली आहेत, अशा स्थितीत माझ्या पोराला पुन्हा पहिलीतच ठेवा गुरुजी, अशी विनवणी काही पालक करताना दिसत असल्याचे चित्र अनेक शाळेत पाहावयास मिळत आहे.

उद्योगांच्या दृष्टीने क्लस्टर महत्त्वाचे; सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

कोरोनाकाळात सर्वात जास्त शैक्षणिक नुकसान झाले, ते न भरून येणारे आहे. मुलांना शाळेची सवयच मोडली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणालीत म्हणावे, असे प्रभावी शिक्षण विद्यार्थ्यांचे झाले नाही. तर ग्रामीण भागात मोबाईलला रेंजच नसल्याने ऑनलाइन शिक्षण उपयुक्त ठरले नाही. तर ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंडच पाहिले नाही. ते विद्यार्थी आता पहिलीतून दुसरीत गेले. तर दुसरीचे तिसरीत गेले म्हणून पालक आता शाळा सुरू होताच गुरूजींना म्हणू लागले. काही करा पण माझ्या मुलाला पहिलीतच ठेवा. असे असले तरी शिक्षण विभागाच्या पोर्टलवर नावनोंदणी पद्धतीमुळे तसे करता येत नाही, असे उत्तर त्यांना मिळत आहे..

1) ऑनलाइन शिक्षण कळलेच नाही. पहिली दुसरीच्या मुलांना शिक्षण दिले गेले. मात्र, कुठलाही विशेष दबाव नसल्याने ऑनलाइन शिक्षण कळलंच नाही.

2) दुसरी, तिसरीचे विद्यार्थी कच्चे

कोरोना काळात २०२० मध्ये इयत्ता पहिली प्रवेश झालेल्या चिमुकल्यांना शाळा कशाला म्हणतात ते कळलंच नाही. पुढच्या वर्षी हेच विद्यार्थी दुसरीत गेले. हा काळही कोरोनाच्या संकटकाळात गेला. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात कच्चे राहिले.

3)ऑनलाईन नोंदणीची अडचण

दुसरी व तिसरीतील मुले अभ्यासात मागे पडलेले आहेत. मात्र, ऑनलाइन नोंदणीची अडचण असल्याने त्यांना माघारी फिरता येत नाही.

अशा आहेत शाळा व विद्यार्थी –

वर्ग १ ते ५ च्या शाळा जि.प. २३२ खासगी ३० एकूण २६२
वर्ग १ली व दुसरी चे एकूण विद्यार्थी ११६८८

ग्रामीण भागातील पालक काय म्हणतात –

मुलीला वयाच्या ६ व्या वर्षी २०२० मध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळवून दिला. मात्र, सलग दोन वर्षे तिला शाळेत न जाता घरीच राहावे लागले. त्यामुळेच अभ्यासात ती मागे पडली.

-लहूराव बारटक्के, पालक, रोहितळ

कोरोनाकाळात शाळांनी ऑनलाइन शिक्षण दिले; मात्र चिमुकल्या मुलांना त्यातले काहीच कळले नाही. यंदा माझा मुलगा तिसरीत गेला आहे; पण अनेक पातळ्यांवर तो माघरलेला आहे .

-शेख शफिक, पालक

कोरोना संसर्गाचे संकट ‘न भुतो न भविष्याती’ अशी आपत्ती होती. अन्य घटकांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातालाही त्याचा फटका बसला. त्यामुळे मुलांचे भविष्य घडविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत .

-वंदना तेजराव हिरे, मुख्याध्यापक, विमला विद्या मंदिर, गेवराई

२०२१ च्या शैक्षणिक सत्रात पहिलीत शाळा प्रवेश झालेली मुले निश्चितपणे अभ्यासात प्रचंड मागे आहेत. आगामी शैक्षणिक सत्रात त्यांच्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. शिक्षकांना यासंदर्भातील सूचना दिलेल्या आहेत

-पंडित गोपाळघरे, गटशिक्षण अधिकारी, गेवराई

हेही वाचलंत का ?  

Back to top button