उद्योगांच्या दृष्टीने क्लस्टर महत्त्वाचे; सुभाष देसाई यांचे प्रतिपादन | पुढारी

उद्योगांच्या दृष्टीने क्लस्टर महत्त्वाचे; सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रात उद्योगांसाठी 6 लाख कोटींचे करार झाले असून, आणखीन होत आहेत. गुंतवणूकदार महाराष्ट्राला पसंती देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर फाउंडेशनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता, डायरेक्टर जनरल प्रशांत गिर्बाने, प्रदीप भार्गव, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यावेळी उपस्थित होते.

देसाई म्हणाले की, रांजणगाव याठिकाणी इलेक्ट्रॉनिक पार्क सुरू होत आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असून असे क्लस्टर उभे राहिल्यास जागतिक दर्जाच्या सेवा देता येतील. छोट्या व्यावसायिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा घेणे परवडू शकत नाही, त्यामुळे क्लस्टर उभे राहिल्यास सर्व स्तरातील व्यावसायिक याचा फायदा घेऊ शकतील, असे देसाई यांनी सांगितले.
आयुक्त पाटील म्हणाले की, अशा प्रकारचे क्लस्टर शहरात उभे राहणे, ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. शहरातील कंपन्यांना याचा फायदा होणार आहे.

Back to top button