Somaiya vs Raut : संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करा, किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगात धाव | पुढारी

Somaiya vs Raut : संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करा, किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगात धाव

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात राज्यसभा निवडणुकीनंतर करण्यात येणाऱ्या आरोप-प्रत्योरोपांचा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगात पोहचला आहे. निवडणुकीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांसंबंधी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी मुख निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली आहे.

निवडणुकीत राऊत यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवून धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला आहे. आमदार दबाब आणण्यासाठी शिवसेना आणि राऊत यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले,अशात ही निवडणूक शिवसेनेने भष्ट्र केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यालयामार्फत देखील आमदारांवर दबाब आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवडणुकीनंतर ४८ तासांपर्यंत राऊत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते.शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान न करणाऱ्या आमदारांची यादी आहे. संबंधित आमदारांना ‘बघून घेवू’ अशी भाषा राऊत यांनी केल्याचा आरोप तक्रारीतून सोमय्या यांनी केली आहे. निवडणुकीनंतर राऊत यांनी छोट्या पक्षाचे तसेच अपक्ष सहा आमदारांचे नाव जाहीर केले आहे.पंरतु, ते अशाप्रकारचे वक्तव्य कसे करू शकतात? कुणी कुणाला मतदान केले हे त्यांना कसे कळाले? सहा आमदारांनी त्यांना मतदान केले नाही हे त्यांना कसे कळाले? असा सवाल देखील सोमय्या यांनी उपस्थित करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Back to top button