पिंपरी : मोरेवस्ती-चिखलीमधील म्हेत्रे गार्डन येथे पार्क केलेल्या टेम्पोमधून दीड लाखांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ही घटना शुक्रवार (10 रोजी) रा. 11 वा. घडली आहे. फिर्यादी रवींद्र दशरथ लिमकर (वय 42 रा. चिखली, मुळ- रूई, परांडा, उस्मानाबाद) यांची एमएच 12 एलटी 7574 क्रं.ची चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद म्हात्रे गार्डनजवळ पार्क केली होती. त्यामधून चोरट्याने एक लाख 39 हजारांचा माल चोरून नेला आहे. फिर्यादीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.