बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी : लातूर विभागाचा निकाल ९४.२२ टक्के | पुढारी

बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी : लातूर विभागाचा निकाल ९४.२२ टक्के

लातूर : पुढारी वृत्तसेवा : बारावी परीक्षेचा लातूर विभागाचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे उत्तीर्णतेत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याच्या निकालात लातूर विभाग चौथ्या क्रमांकावर स्थिरावला आहे.

विभागात ९० हजार २२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ८८ हजार ८३० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८४ हजार ६१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले. लातूर विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.३०, कला ९१.८९ तर वाणिज्य शाखेचा निकाल ९५.३४ टक्के लागला आहे. लातूर विभागात सर्वच शाखांत लातूर जिल्हयाने आघाडी मारली आहे. विज्ञान शाखेचा ९८.५४, कला ९३.४१ व वाणिज्य शाखेचा निकाल ९६.०५ टक्के असा लागला आहे.

नांदेड जिल्हयाचा निकालाची विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी ९८.३१, कला ९१.५५, वाणिज्य ९५.१९ अशी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा विज्ञान ९७.६९, कला ९०.१० तर वाणिज्य शाखेचा निकाल ९२.३६ टक्के असा आहे. परीक्षेच्या दरम्यान विभागात ३८ गैरप्रकार आढळून आले होते. त्याची दखल घेत संबंधित सर्वच विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यात आली होती, असे तेलंग यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button