मराठवाडा : युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला | पुढारी

मराठवाडा : युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला

दैठणा; पुढारी वृत्तसेवा :  युवकाचा खून झाल्‍याची घटना उघडकीस आली आहे. आंबेटाकळी शिवारात जायकवाडी कॅनॉलमध्ये युवकाचा मृतदेह आढळला. अतुल बुचाले (वय २५) असे त्‍याचे नाव आहे. खून करुन त्‍याचा मृतदेह कालव्‍यात फेकून दिल्याची बाब उघड झाली आहे. याप्रकरणी अतुल याच्‍या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंद झाला आहे.

परभणी तालुक्यातील धोंडी येथील नितीन पंढरीनाथ बुचाले यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. नितीन याला १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तीन मिसकॉल दिसले.

नितीनने त्याचा भाऊ अतुल याच्या मोबाईलवर संपर्क साधला. पोरवड येथील श्रावण सरवदे यांनी फाेन उचलला.

यावेळी नितीनने अतुलबाबत विचारणा केली असता तो रक्‍ताच्या थारोळयात कॅनॉलमध्ये पडलेला असल्याचे सरवदे यांनी सांगितले.

नितीनने तात्काळहनुमान शिंदे, अमोल शिंदे, सुरज बुचाले यांना फोनवरून संपर्क साधत या घटनेची माहिती देवून घटनास्थळाकडे जाण्यास सांगितले.

घटनास्थळी अ‍ॅम्बुलन्ससह पोलिस दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास दाखल झाले होते.

आंबेटाकळी शिवारातील जायकवाडी कॅनॉलजवळ भोगाजी पायतिडक यांच्या उसाच्या शेतालगत अतुल बुचाले  याला धारदार शस्त्राने मारहाण करून जीवे मारल्याचे नितीन बुचाले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी दैठणा ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : कणखर सह्याद्रीत दरडी का कोसळत आहेत?

Back to top button