श्रीगोंदयातील ‘श्री काशी विश्वनाथ’साठी 4 कोटी, माजी आमदार जगतापांचा पाठपुरावा | पुढारी

श्रीगोंदयातील ‘श्री काशी विश्वनाथ’साठी 4 कोटी, माजी आमदार जगतापांचा पाठपुरावा

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा तालुक्यातील श्री काशी विश्वनाथ देवस्थान श्रीगोंदा परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीला यात्रोत्सव असतो. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाठपुरावा करुन श्री काशी विश्वनाथ देवस्थानसाठी प्रादेशिक पर्यटन योजनेतर्गत चार कोटी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली.

धुळे : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणचे एक पाऊल पुढे; गो ग्रीन योजनेस प्रतिसाद

पुलासह अप्रोच रोड तयार करणे, घाट बांधकाम, इमारत बांधकाम, स्टोअर इमारत, दर्शन रांगेसाठी इमारत बांधकाम, मंदिरासमोर सभामंडपाचे बांधकाम होणार आहे. प्रसादालय इमारतीच बांधकामदेखील होणार आहे. मंदिरासाठी सरंक्षण भिंत तसेच परिसरामध्ये पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येणार आहे.

किर्लोस्कर वसुंधरा नदी पुनरुज्जीवन’मार्फत सोमेश्वर मंदिर कुंड परिसरात रिड बेडचा प्रयोग

भाविकांसाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करणेत येणार आहे. त्यासोबत परिसरातील भावीकांच्या सोईसाठी एक नवीन मंगल कार्यालय बांधकामाचे देखील नियोजन यामध्ये होणार आहे. याकामासाठी काशी विश्वनाथ देवस्थानचे अध्यक्ष सोन्याबापू वाणी, उपाध्यक्ष नानासाहेब रणसिंग, सचिव पांडुरंग व्यवहारे, अमोल कोहक, माजी उपसरपंच अमोल वाणी, ग्रामपंचायत सदस्य माणिकअप्पा व्यवहारे, खजिनदार अनिल टकले, आजीनाथ ढोरजकर, अंबादास वाळके, जालिदंर व्यवहारे, बापुराव व्यवहारे, पांडुरंग ढोरजकर, मारुती मेटे तसेच सर्व देवस्थानचे सर्व विश्वस्त यांनी वेळोवेळी याकामासाठी पाठपुरावा केला होता.

Back to top button