मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला १५ अटी- शर्तींसह परवानगी, जाणून घ्या काय आहेत अटी?

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ८ जूनला औरंगाबाद शहरात जाहीर सभा होणार आहे. या सभेला आता पोलिसांनी परवानगी दिली आहे, सभेसाठी १५ अटी घालून दिल्या आहेत.
१ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये झाली होती. त्या सभेला पोलिसांनी १५ अटींसह परवानगी देण्यात आली होती. आता शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात होत आहे.
या सभेची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. परंतु पोलिसांनी आतापर्यंत या सभेला परवानगी दिली नव्हती. आता चार दिवस आधी आज या सभेला परवानगी देण्यात आली आहे. १५ अटी शर्तीसुद्धा लावण्यात आल्या आहेत. अटी आणि शर्ती न पाळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे.
अशा आहेत अटी आणि शर्ती
– सभा ठरलेल्या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
– कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे रस्ता रहदारीस बंद करण्यात येवू नये. वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
– सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
– सभेसाठी येताना अथवा परत जाताना मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
– कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये अथवा प्रदर्शन करु नये.
– सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये. क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार घरले जाईल.
हे ही वाचा :
- कोल्हापूरच्या २ मल्लांमध्ये ‘कुस्ती’ अटळ; राज्यसभा बिनविरोधचा ‘मविआ’चा प्रस्ताव भाजपने फेटाळला
- कुणाशीही थेट युती नाही; राज ठाकरे यांचे मनसैनिकांना संकेत
- कोरोनात रुग्णवाहिकेचे भोंगे ऐकू यायचे, आता इतरांचे भोंगे ऐकू येताहेत : उद्धव ठाकरे