वाशिम : माजी आमदार सुरेश इंगळे यांचे निधन | पुढारी

वाशिम : माजी आमदार सुरेश इंगळे यांचे निधन

वाशिम ; वाशिम/मंगरूळपीर :  माजी आमदार सुरेश इंगळे : विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार तथा महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्ती सुरेश भिवाजी इंगळे यांचे (गुरुवार) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. त्‍यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

त्‍यांच्यावर येथील आयकॉन हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची गुरूवारी रात्री उशिरा प्राणज्योत  मालवली.

त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील एक लोकनेता गेल्याने वाशिम जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राजकीय कार्यकाळ

त्यांचा राजकीय कार्यकाळ पाहता मराठवाडा आणि विदर्भ सीमेवरील हिंगोली व वाशिम जिल्ह्यालगत पैनगंगा नदीवरील ब्यारेजेसचे काम दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी नव संजीवनी ठरले आहे.

यासोबत त्यांनी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्यभार सुद्धा पारदर्शकपणे हाताळला आहे.

तर त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांची समाजात चांगली ख्याती होती.

त्यांच्यामागे मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज (गुरूवार) दुपारी १:०० वाजता स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्‍यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

व्हिडिओ पहा : ज्ञानकौशल्य आणि वागणूक हीच यशाची गुरुकिल्ली

Back to top button