आनंद महिंद्रांचे दिग्‍दर्शक रोहित शेट्टीला थेट चॅलेंज! ”माझी नवी स्कॉर्पिओ…” | पुढारी

आनंद महिंद्रांचे दिग्‍दर्शक रोहित शेट्टीला थेट चॅलेंज! ''माझी नवी स्कॉर्पिओ...''

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिंद्रा ॲण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra ) हे नेहमीच  ट्विटरवरील आपल्या गंमतीशीर कमेंट्सनी लोकांची मने जिंकतात.अलीकडेच त्यांनी सोशल मिडियावर एक मीम शेअर करत अ‍ॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीला चॅलेंज दिले आहे. आनंद महिंद्रा यांच्या या मीम्समुळे सोशल मीडियावरील चर्चेला उधाण आले आहे.

वास्तविक हा मीम महिंद्रा यांच्या एका फॉलोअरने महिंद्राच्या नव्या स्कॉर्पिओ-एनच्या टीझरबद्दल केला होता. रोहित बिश्नोई नावाच्या युजरने आपल्या पोस्टद्वारे असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, महिंद्राची स्कॉर्पिओ-एन ही नवीन एसयूव्ही बाजारपेठेत दाखल झाली आहे. त्यामुळे आता रोहित शेट्टी त्याच्या नव्या प्रोजेक्टमध्ये ही कार उडविण्याचा विचार करत असेल. ”अभी मजा आएगा ना भिडू है” हा कॅामेडी अभिनेता जॉनी लीव्हरचा प्रसिद्ध डायलॉगचा देखील या युजरने शेअर केला हाेता.

‘रोहित शेट्टीला अणुबॉम्ब हवा आहे’

आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, ‘रोहित शेट्टीजी ही कार उडवण्यासाठी तुम्हाला अणुबॉम्ब लागेल.’ रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांमध्ये गाड्या उडवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. याबाबत सोशल मीडियावर बरेच मीम्स देखील व्हायरल होतात. त्याच्या अनेक या चित्रपटांमध्ये कारचे स्टंट पहायला मिळतात.

स्कॉर्पिओ-एनच्या टीझरला अमिताभ बच्चन यांचा आवाज

कंपनीने लॉन्च केलेल्या नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनच्या टीझरला अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे. या टीझरमध्ये बच्चन यांचे बोल आहेत की, ”अभिनंदन, वडील झाले आहात! नाव आहे N…Scorpio N.” कंपनीने नुकताच नवीन SUV चा टीझर लाँच केला आहे. महिंद्र या कारला SUV चा बिग डॅडी म्हणत आहे. त्याचे लाँचिंग 27 जून रोजी होणार आहे.

हेही वाचा

Back to top button